जळगाव मिरर | १ जुलै २०२५
जळगावच्या मुलीचे परस्पर कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून देण्यासह लग्नासाठी दिलेले पैसे व दागिने परत मिळण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे मुलीच्या वडीलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी तीन जणांना अटक झाली. तर ज्या तरुणासोबत मुलीने ला केले, त्या आशीष सदाशिव गंगाधरे (वय ३०, रा. थेरगाव, ता. शाहवाडी, जि. कोल्हापूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून मुलीसह मध्यस्थी, अशा एकूण पाच जणाविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून मुलीच्या बनावट लग्रामुळे बापाचा बळी गेल्याचे पोलिसांच्या तपासात उघड होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कायर्यालयात सोमवारी पत्रका परिषदेत पार पडली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली, या वेळी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, शहरातील हरिविठ्ठल नगरातील ४१ वर्षीय इसमाच्या मुलीचे कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून दिले. लग्नात दिलेले पैसे तसेच सोने परत देण्याचा तगादा लावल्याने मलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार रविवारी रामानंद नगर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्यावरून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सचिन दादाराव अडकमोल (रा. जळगाव) याला दि. २९ जून रोजी तर मुलीचा पती आशीष सदाशिव गंगाधरे व त्याचा भाऊ आप्पासाहेब बजरंग गंगाधरे (दोन्ही रा. थेरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) व मनिषा उर्फ मिनाक्षी दिनेश जैन यांना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
जळगवात सोबत पत्ती असल्याने त्याने तगदा लावून मुलीला पुन्हा कोल्हापूर येथे घेवून गेला. त्यानंतर एप्रिल महिन्यात ती मुलगी पुन्हा जळगावात आली आणि सासरी जाण्यास टाळाटाळ करु लागली. तिला पतीने घरी नेण्यास सांगितले असता ती आली नाही व पैसे, दागिने परत मागितले असता ते देखील दिले नाही. मुलीला कॉल करून ती वेत नव्हती व तिने मोबाईल बंद करून ठेवला. मुलीचा पती आशीष गंगाधरे व आप्पासाहेब गंगाधरे हे दि. २४ जून रोजी मुलीच्या शोधात जळगावात आले. त्यावेळी त्यांना मुलीचे आई-वडिल असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला, त्यांनी मुलीच्या कुटुंबियांचा शोध घेत तिच्या आईला विचारणा केली. त्यावेळी तिच्या आईने ज्यांनी ला लावले लांना विचारा असे सांगत त्यांना धडकावन लावले. आशीष गंगाधरे यांनी रागानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सदर मुलगी, मीनाक्षी दिनेश जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर व धनश्री (पूर्ण नाव समजू शकले नाही) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
