जळगाव मिरर | 24 जुलै 2026
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील मकरंद नगर परिसरात राहणाऱ्या समाजकल्याण विभागातील कनिष्ठ लिपिक पूजा गोपाळ जवळकर (वय २९) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वरणगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांत दाखल झालेल्या माहितीनुसार, पूजा जवळकर यांचा विवाह वरणगावातील नितीन प्रभाकर चौधरी यांच्याशी झाला होता. त्यांना वेदांत व प्रीत ही दोन मुले आहेत. कौटुंबिक कारणांमुळे पूजा व नितीन चौधरी या दोघांनी घटस्फोट घेतला होता. मात्र, मुलांच्या संगोपनासाठी पूजा या पती नितीन चौधरी व दोन्ही मुलांसह वरणगावातील मकरंद नगरमध्ये राहत होत्या. त्या जळगाव येथील समाजकल्याण विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, २२ जुलैला रात्री १० वाजेच्या सुमारास नितीन चौधरी यांनी पूजा यांचे नातेवाईक भरत श्रीधर पाटील (रा. दीपनगर) यांना दूरध्वनीवरून पूजा यांनी गळफास घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर भरत पाटील तातडीने वरणगाव येथे पोहोचले. घरात जाऊन पाहिले असता पूजा यांनी या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेले आढळून आले. त्यानंतर तत्काळ वरणगाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांच्या उपस्थितीत सचिन निवृत्ती माळी व मनोज उत्तम माळी यांच्या मदतीने पूड यांना खाली उतरवून वरणगावच्या ग्रामी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांन मयत घोषित केले.
या प्रकरणी भरत श्रीधर पाटील यांन दिलेल्या माहितीवरुन वरणगाव पोली ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्या आली आहे. मयत पूजा जवळकर यांच् पश्चात मुलगा, मुलगी, पती असा परिव आहे.




















