जळगाव : प्रतिनिधी
जळगांव जिल्ह्यातील गायी-म्हशींमधील लंपी स्किन डीसिज रोगप्रदुर्भाव बाबत आज रोजी झालेल्या जळगांव जिल्ह्यातील गायी-म्हशींमधील लंपी स्किन डीसिज रोगप्रदुर्भाव बाबतमहसुल व पशुसंवर्धन मंत्री ना.राधाकष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि ८ रोजी आढावा बैठक झाली. यावेळी खा.उन्मेष पाटील, खा.रक्षाताई खडसे, आ.एकनाथराव खडसे, आ. लताताई चंद्रकांत सोनवणे, आ.राजूमामा भोळे, आ.संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची उपस्थिती होती.
यावेळी बैठकीत चोपडा मतदार संघाच्या आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी लंपीची साथ असल्याने गायी-म्हशींचे लसीकरण तसेच ज्या शेतकऱ्यांची जनावरे या आजारामुळे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना आर्थिक मदत करावी आणि महसूल कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तसेच पशू संवर्धन विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत असे निवेदन महसूल व पशू संवर्धन मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले.प्रसंगी मंत्री महोदयांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांना दिले.