जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२५
प्रयागराजमधून पुन्हा एकदा आगीची बातमी समोर आली आहे. महाकुंभाच्या सेक्टर ८ च्या शिबिरात ही आग लागली आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. अजुनपर्यंत कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. मात्र या आगीत मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानीचे वृत्त नाही. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाने या आगीवर नियंत्रण मिळवले.
आज महाकुंभातील श्री कपी मानस मंडल शिबिरातील २ तंबुंना आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. ग्राहक संरक्षण समितीच्या छावणीतील एका तंबूत आग लागली होती जी अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहनांमधून पंपिंग करून तात्काळ विझवली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महाकुंभमेळ्यात याआधी ७ फेब्रुवारीला आगीची घटना घडली होती. यावेळी हरिहरानंदच्या तंबुत आग लागल्याची घटना घडली. तंबूतून उंच ज्वाळा उठताना दिसत होत्या. अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. महाकुंभात आग लागल्याचा व्हिडिओही समोर आला हाेता.