
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील प्रताप मिल कंपाउंड परिसरात असणाऱ्या एका घराचा कड़ी कोंडा तोडून चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २० रोजी रात्री घडली. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रताप मिल कंपाउंड परिसरात राहणाऱ्या कैलास शांताराम बिरारी यांच्या घरी दि. २० रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा टॉमीच्या साहाय्याने कडी कोंडा तोडून घरातील कपाटात असणाऱ्या सुमारे १७ ग्रॅम वजनाचे ४२ हजार ५०० रुपये किंमत असलेली मंगल पोत, व चार ग्रॅम वजनाची १० हजार रुपये किंमत असलेले सोन्याचे कानातील कर्णफुले व खिशातील नऊ हजार रुपये रोख असा ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली.





















