जळगाव मिरर / ११ फेब्रुवारी २०२३ ।
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील बंद घरातून चोरटयांनी जवळपास सात लाखांचा ऐवज लांबविला. ही घटना बुधवार ते शुक्रवार या दरम्यान शेंदुर्णी येथे घडली. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेंदुर्णी येथील अमित श्रीदत्त अग्रवाल यांचे लग्न होते. त्यासाठी सर्व परिवार ८ ते १० फेब्रुवारी या दरम्यान पाचोरा येथे गेले होता. यावेळी घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरावरील गच्चीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. अमित यांच्या कपाटातील तीन लाख रुपये रोख व १३ तोळे सोने असा एकूण सहा लाख ९० हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. याबाबत जोगेश्वर अनिल अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसपी अभयसिंह देशमुख (चाळीसगाव) व पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांएनी घटनास्थळी पाहणी केली आहे तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहेत.
