जळगाव मिरर | १८ जुलै २०२३
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नुकतेच ९ वर्ष पूर्ण झाल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे देशाभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून हे वर्ष साजरे केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून जळगाव शहरातील माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांनी शहरातील वेग-वेगळ्या भागात जाऊन प्रत्येक विद्यार्थी पर्यंत पोहचत वही वाटप करीत आहे.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थींना त्यासोबत सुप्रीम कॉलनी मनपा शाळा क्र.३२ तर शहरापासून दूर असलेल्या वंचित घटकापर्यंत या वहीचे वाटप करून त्या घटकाला सुद्धा लाभ देण्याचे कार्य सुरु आहे. या दोन्ही परिसरात माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत जाऊन वही वाटप सुरु आहे. या प्रसंगी धीरज जावळे, अर्जुन सोनवणे, विठ्ठल पाटील, गुड्डू पठाण, भूषण जाधव, आकाश पारधे, मनोज चव्हाण, आसिफ सय्यद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.