जळगाव मिरर / २ मार्च २०२३ ।
दिल्ली शैक्षणिक धोरणाचा चेहरा माजी उपमुख्यमंत्री आणि माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा आम आदमी पार्टी युवा आघाडी यांनी जळगावच्या मुख्य चौकात आंदोलन केले.
मनीष सिसोदिया यांनी दिल्लीत शिक्षण क्रांती घडवून आणली दिल्लीच्या सरकारी शाळांचा दर्जा खाजगी शाळांच्या बरोबरीने आणला. त्यांनी दिल्लीत एक स्वतंत्र स्कूल एज्युकेशन मॉडेल स्थापन केले. दिल्लीत त्यांनी अनेक विकास कामे केली. आज श्री.मनीष सिसोदिया यांना अटक होऊन ते जेलमध्ये आहेत ही खेदाची बाब आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध केला.
युवा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी जळगाव शहर दणाणून टाकले होते.”मनीष सिसोदिया तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” ” जेल के ताले तुटेंगे मनिष सिसोदिया छुटेंगे” ” देश का नेता कैसा हो केजरीवाल जैसा हो” असे नारे देऊन युवा आघाडीने आपल्या निषेध नोंदवला.
यावेळी आम आदमी पार्टी उपाध्यक्ष विठ्ठल साळुंखे, युवा जिल्हाध्यक्ष अमृता नेतकर, रईस खान , आप महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर, युवा जिल्हाउपाध्यक्ष पुरुषोत्तम भालेराव, युवा जिल्हा संघटक रितेश सोनवणे, जिल्हा सचिव हर्षल भावसार, युवा शहराध्यक्ष नाझीम कुरेशी, युवा शहर सचिव ललित चव्हाण, ॲड. विजय दाणेज, रईस कुरेशी, अनिस शेख, आरिफ खान, शुभम सोनवणे, सिध्दार्थ सोनवणे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
