जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३
गेल्या महिन्याभरापासून राज्यातील सबसे कातील गौतमी पाटील नेहमीच अनेक वादात अडकत असतांना दिसून येत असतांना आता पुन्हा एकदा ती एका कार्यक्रमानिमित्त वादात अडकत आहे. पनवेलमधील एका गावात तिचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील वावंजे गावात असणाऱ्या सहारा रिसॉर्टमध्ये अंकित वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाची कोणतीही पोलीस परवानगी न घेता विना परवाना आयोजकांनी सदर कार्यक्रम घेतला. त्यामुळे पोलिसांनी आता आयोजकांवर गुन्हा दाखल केलाय. विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर करत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजक रमाकांत चौरमेकर, अंकित वर्मा आणि सहारा रिसॉर्टचे मालक तसेच व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.