जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२५
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणजे चीन. मात्र, गेल्याकाही वर्षात चीनच्या जन्मदरात घट झाल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपर्यंत चीनमध्ये केवळ एक मुलं जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता चीनकडून पुन्हा एकदा लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न केला जात आहे. चीनकडून नागरिकांना लग्न करण्यासाठी पैसेही दिले जात आहेत.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे अधिकारी तरुणांना लग्न करण्यास व मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. चीनमध्ये अनेक तरूण-तरूणी लग्न करणे टाळत आहे. याचा परिणाम देशातील जन्मदरावर देखील पाहायला मिळत आहे. एकीकडे चीनच्या लोकसंख्येतील मोठी संख्या वृद्ध होत असताना, कार्यकारी लोकसंख्येतही घट होत आहे.
रिपोर्टनुसार, लग्नाची नोंदणी केल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांकडून जोडप्यांना पैशांचे वाटप केले जात आहे. झांग गैंग आणि वेंग लिनबिन या अशाच एका जोडप्याला लग्न केल्यानंतर चिनी अधिकाऱ्यांनी 1500 युआन म्हणजेच जवळपास 200 डॉलर दिले. चीनच्या उत्तरेकडील शांक्सी या प्रांतातील स्थानिक अधिकारी लोकांना लग्न केल्यास रोख रक्कम देत आहेत. चीनच्या लुलियांग शहरातील जोडप्यांना लग्न केल्यानंतर जवळपास अर्ध्या महिनाचा पगार दिला जात आहे.
देशातील वैवाहिक परिस्थिती सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांकडून जोडप्यांना पैसे दिले जात आहेत. दरम्यान, वर्ष 2024 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी चीनची लोकसंख्या घटली आहे. त्यामुळे सरकारकडून विविध मार्गाने नागरिकांना लग्न करण्यास व मुलं जन्म घालण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.