जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२४
येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे “केपी इन्फोटेक व डीजीविंटेज” या आयटी कंपनीमार्फत जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “भव्य रोजगार मेळाव्या”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व निवडकर्ते म्हणून “डीजीविंटेज” व “केपी इन्फोटेक” या कंपनीचे संचालक श्री. राजेश काळे तसेच जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते.
यावेळी १९० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली तर ११० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या संकल्पनेतून रोजगार, समपुदेशन व मार्गदर्शन केंद्राची महाविद्यालयात स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयात असलेल्या ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सतत प्रयत्न करणे व विध्यार्थ्यानी व्यवसाय करावा यासाठी महाविद्यालयातील हे केंद्र कार्य करते असे सांगितले. सुरवातीला कंपनीचे संचालक श्री. राजेश काळे यांनी मुलाखती व निवड प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजवून सांगत विविध टप्यात उपस्थित विध्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती घेतल्या. ट्रैनिंग अँड प्लेसमेंट डीन प्रा. तन्मय भाले यांनी या उपक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्लेसमेंट आसोसीएट डीन प्रा. मनीष महाले यांनी सूत्रसंचालन केले तसेच प्रा. करिष्मा चौधरी, प्रा. तुषार वाघ व ट्रेनर कपिल शर्मा यांनी सहकार्य केले. सदर परिसर मुलाखतीत सहभागी विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले़.
