• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

घरकुल योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्यात यावी : जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 5, 2024
in जळगाव
0
घरकुल योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जानेवारी २०२४

जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या लोकाभिमुख आहेत. प्रधानमंत्री आवास, रमाई आवास शबरी घरकुल, मोदी आवास व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेच्या माध्यमातून तळागाळातील गरीब लाभार्थ्यांना आपल्या स्वप्नाचे घरकुल मिळेल यासाठी या घरकुल योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी. अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली‌.

ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात ज‍िल्हा पर‍िषदेअंतर्गत सुरू असलेल्या व‍िव‍िध कामांच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार लता सोनवणे, आमदार किशोर पाटील, ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद, जिल्हा पर‍िषदेचे मुख्य कार्यकारी अध‍िकारी अंक‍ित, फैजपूर उपविभागीय अधिकारी देवयानी यादव, अत‍िर‍िक्त मुख्य कार्यकारी अध‍िकारी राजेश लोखंडे, रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अध‍िकारी अनिकेत पाटील, भारत कोसोदे, ज‍िल्हा पर‍िषद बांधकाम व‍िभाग कार्यकारी अभियंता एस.बी.पाटील, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, व‍ित्त व लेखा अधिकारी बाबुलाल पाटील आदी उपस्थ‍ित होते.

केंद्र व राज्य शासनाद्वारे प्राप्त व‍िविध न‍िधीअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा पर‍िषद रस्ते बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, सर्व प्रकारच्या आवास योजनांची प्रगती, जलजीवन म‍िशन प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी ज‍िल्हा न‍ियामक सम‍ितीची बैठक ही घेण्यात आली.

पालकमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सडक योजनेतील ग्रामीण रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण करण्यावर भर द्यावा. मार्च २०२४ पर्यंत ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्ण झाली पाहिजेत‌. अशी अपेक्षा ही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

घरकुलांसाठी जागा देतांना‌ त्याठिकाणी रस्ते, पाणी, वीज, मलनिस्सारण व्यवस्था सहज व्यवस्थित असल्याची खात्री करावी. जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्यात यावी. खेड्यामध्ये काही गल्ली -भागात पाईप‌लाईन पोहचली नसल्यास नव्याने प्रस्ताव तयार करण्यात यावा. गावातील प्रत्येक भागात पाणी पोहचले पाहिजे. गावात पाण्याचा स्रोत नसेल तर विहिरी खोदून गावांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावी. यासाठी पोलीस संरक्षण देऊन विहीर खोदण्यात यावी‌‌. जलजीवन मिशनचे काम झालेल्या ठिकाणी बोर्ड लावण्यात यावे. जलजीवन मिशन योजनांची कामे पूर्ण झाल्यावर खासदार व आमदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात यावे‌. असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

सार्वजनिक शौचालयांसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी‌‌ उपलब्ध आहे. यासाठी ग्रामपंचायतीने तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात यावा. मार्च २०२४‌ पर्यंत जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे बांधकामे पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक रूग्णालयात आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून कार्डधारकांवर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार करण्यात यावा. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, किशोर पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला व सूचना दिल्या.

घरकुलांसाठी २१ हजार ६०० भूमीहीन लाभार्थ्यांना जिल्ह्यात जमीनी देण्यात आल्या आहेत. मोदी आवास योजनेत घरकुल मंजूरीत जळगाव राज्यात प्रथम क्रमांकावर आहे‌. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी यावेळी माहिती दिली.

Tags: Gharkul yojanajaljivan mishanPalakmantri Gulabrao Patil

Related Posts

दोन वर्षांपासून फरार; अखेर जबरी चोरीतील दोन आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची धुळ्यात कारवाई !
क्राईम

दोन वर्षांपासून फरार; अखेर जबरी चोरीतील दोन आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची धुळ्यात कारवाई !

October 22, 2026
जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !
क्राईम

जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

October 22, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वैद्यकीय प्रवेशाचे आमिष, बनावट गुणपत्रकाचा खेळ : तरुणाची ७ लाखांची फसवणूक!

October 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

आदिवासींच्या आंदोलनावरून लोकसंघर्ष मोर्चाच्या उपाध्यक्षांविरुद्ध ३ गुन्हे दाखल!

October 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अमळनेर तालुक्यात खळबळ! दोन महिलांचा मृत्यू; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

October 21, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

मका खरेदीच्या नावाखाली २१.९४ लाखांचा गंडा : चेन्नईच्या व्यापाऱ्याची फसवणूक !

October 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
दोन वर्षांपासून फरार; अखेर जबरी चोरीतील दोन आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची धुळ्यात कारवाई !

दोन वर्षांपासून फरार; अखेर जबरी चोरीतील दोन आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची धुळ्यात कारवाई !

October 22, 2026
जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

जाब विचारताच चॉपरने हल्ला : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर तर पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

October 22, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वैद्यकीय प्रवेशाचे आमिष, बनावट गुणपत्रकाचा खेळ : तरुणाची ७ लाखांची फसवणूक!

October 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

आदिवासींच्या आंदोलनावरून लोकसंघर्ष मोर्चाच्या उपाध्यक्षांविरुद्ध ३ गुन्हे दाखल!

October 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group