• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

तीन राशींना दिवस चांगला फक्त ‘हे’ काम करू नका !

आजचे राशिभविष्य दि २१ जून २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 21, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्या कामात मदत करताना दिसेल. घरापासून दूर राहून स्पर्धेची तयारी करणाऱ्या तरुणांना आज आपल्या कुटुंबाची आठवण येईल. आज तुमची नोकरीत कामगिरी चांगली राहील. नोकरीत अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल, पण बदली होण्याचीही शक्यता आहे. आज आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. तुमचे एखादे काम थांबले असेल तर ते आज शेजाऱ्यांच्या मदतीने पूर्ण होईल.

वृषभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार लोकांना आज नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. जे युवक कामाच्या शोधात फिरत आहेत, त्यांना मित्राच्या मदतीने रोजगार मिळेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी काळ चांगला आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा असेल. आज तुमचे जास्त पैसे खर्च होऊ शकतात. पैशांचा जपून वापर करा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

मिथुन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे घरापासून दूर काम करतायत त्यांना आपल्या कुटुंबीयांची आठवण येईल. आज तुमची जवळच्या मित्राशी भेट होईल. यामुळे तुमच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. आज व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आज नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. अनावश्यक वाद टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कर्क – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आज तुम्हाला मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने, उत्पन्नाच्या काही नवीन संधी देखील उपलब्ध होतील, ज्यातून तुम्हाला फायदा होऊ शकेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते आज परत करा. तुमच्या मनातील काही गोष्टी आज पालकांबरोबर शेअर करा. तुमचं मन हलकं होईल. आज सासरच्या मंडळींकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या लोकांना अपेक्षित नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज राजकारणात चांगला दिवस आहे. तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा.

सिंह – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नक्कीच फलदायी आहे. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे लोक व्यवसायात बदलासाठी वरिष्ठांशी बोलतील. नोकरदार लोकांना नोकरीत बदल दिसतील. तुम्हाला तुमची कोणतीही मालमत्ता विकायची असेल तर वेळ चांगला आहे. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळतील. आर्थिक सुखात वाढ होईल. नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायात धनप्राप्ती होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. आज कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. शैक्षणिक कार्यात मान-सन्मान राहील.

कन्या – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करतायत ते व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील. नवीन लोकांच्या संपर्कामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील उपलब्ध होतील. नोकरीत बढतीची संधी मिळेल. जोडीदाराच्या कामातील यशामुळे आज कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. घरोघरी पूजा, पाठ,पठण यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. बँकिंग क्षेत्रात यश मिळू शकते. तुमचे आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले राहील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

तूळ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज घरातून बाहेर पडताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडा. तुमची सर्व कामे पूर्ण होतील. आज शेजाऱ्यांच्या मदतीने उत्पन्नाच्या संधीही उपलब्ध होतील. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, जेणेकरून तुमचे मन आवडत्या गोष्टीत रमेल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना चांगले फायदे मिळतील. व्यवसायात प्रगती दिसून येईल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत पदोन्नतीचीही शक्यता निर्माण झाली आहे.

वृश्चिक – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असणार आहे. नोकरीत नवीन जबाबदारीचा फायदा होईल. अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय पुढे नेण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आज व्यवसायाशी संबंधित कोणत्याही योजनांवर निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बसवून काही काम पूर्ण होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा ठेवावा लागेल. आज आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुमची आवडती कामे करा. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरुन वाद होऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या समजुतीने सर्व काही ठीक कराल.

धनु – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी काळ चांगला आहे, नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. आज तुमच्या जीवनात सुख-शांती राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बाहेर जाण्याचा विचारही कराल. घरातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा असेल, सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. आज तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. आज आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. घरातून बाहेर पडताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, तिथे थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज कलात्मक क्षेत्रात वाढ होईल.

मकर –  राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न जास्त असेल. मित्रांच्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकाल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. आज तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, त्यात सर्व ओळखीच्या व्यक्तींची ये-जा सुरु राहील. आज कोणासाही पैसे उधारी म्हणून देऊ नका. तुम्हाला ते परत मिळतीलच याची शक्यता फार कमी आहे.

कुंभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातून भरपूर नफा मिळेल. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर त्यालाही पूर्ण पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दबावामुळे आणि घरातील कलहामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे कामावर तुमची एकाग्रता दिसणार नाही. आज ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा, यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. भावा-बहिणींचेही पूर्ण सहकार्य मिळेल.

मीन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. नवीन वाहनाचा आनंद मिळण्याचे संकेत आहेत. घर, फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर पालकांना खूप आनंद होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधीही मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे मित्र खूप खूश होतील. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल.

Tags: #todayhorscorp

Related Posts

या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026

Recent News

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group