• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2026
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जुलै २०२६

अमळनेर शहराचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या संत सखाराम महाराज संस्थानात लागलेल्या भीषण आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मंदिर परिसराची सविस्तर पाहणी करून त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला तसेच संस्थानच्या विश्वस्तांशी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक माहिती जाणून घेतली.

यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “संत सखाराम महाराज हे अमळनेरचे ग्रामदैवत असून लाखो भाविकांच्या श्रद्धा आणि विश्वासाचे केंद्र आहेत. या पवित्र स्थळी लागलेली आग ही अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. शासन या संकटात संस्थानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. नुकसानीचा सविस्तर अहवाल प्राप्त होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्याशी चर्चा करून मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

पाहणी दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संत सखाराम महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर ते म्हणाले की, सखाराम महाराज संस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी शासन स्तरावर आवश्यक प्रस्ताव सादर करून मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. या ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशाचे संवर्धन आणि जतन करणे ही शासनाचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या पवित्र संस्थानातील आगीत अप्रतिम नक्षीकाम असलेला सुमारे ४०० वर्षे जुना सागवान लाकडाचा ऐतिहासिक सभामंडप पूर्णतः जळून खाक झाला असून संस्थानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

यांची होती विशेष उपस्थिती
यावेळी संत सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख विश्वस्त प.पू. श्री प्रसाद महाराज (गुरु ज्ञानेश्वर महाराज), विश्वस्त रविकांत देशमुख, जयंत मोडक, एकनाथ सातपूरकर, प्रसाद नाईक, संस्थानचे सल्लागार राजेंद्र भामरे, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक होते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगरसेवक पंकज चौधरी, पंकज भोई, अबू महाजन, पांडू भोई, गुलाब पाटील, श्रीराम चौधरी, नाना धनगर, सुरज परदेशी, भैय्या परदेशी, रवी पाटील, नगरपालिकेचे व संबंधित विभागांचे अधिकारी, सेवेकरी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी यांचे केले कौतुक
यावेळी आगीवर तातडीने नियंत्रण मिळवून मोठी हानी टाळणाऱ्या अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कार्याचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष गौरव केला. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी तसेच कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख, जफर पठाण, सत्येन संदानशिव, आनंद झिम्बल, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, रफीक पठाण, आकाश संदानशिव, लखन कंखरे, आकाश बाविस्कर आणि अजय बिऱ्हाडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संकटाच्या कठीण प्रसंगी जीवाची पर्वा न करता त्यांनी दाखविलेल्या धाडस, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेचे पालकमंत्र्यांनी मनापासून कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

Related Posts

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !
जळगाव ग्रामीण

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

September 27, 2026
गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !
जळगाव

गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

September 26, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group