
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील दहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेल्या करी रोड येथील गोविंदाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. प्रथमेश सावंत असं या गोविंदाचं नाव आहे.
करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळातील जखमी गोविंदाचा गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून संघर्ष सुरू होता. मात्र, आज दि ८ ऑक्टोबर शनिवार रोजी त्याची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन महिन्यांपासून केईएम रुग्णालयात त्याच्यावर सुरु उपचार होते. प्रथमेशला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई काँग्रेस आणि शिवसेनेनं पुढाकार घेतला होता. मात्र, आज त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. प्रथमेशचे आई-वडील काही वर्षांपूर्वीच वारले होते. त्यामुळं चुलत्यांकडंच प्रथमेश वास्तव्याला होता. तो आयटीआयचे शिक्षण घेत होता.




















