जळगाव मिरर । २ ऑगस्ट २०२३
जळगाव शहरात गेल्या काही दिवसाआधी नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांनी शहरातील विकास कामे रखडले आहेत. याबाबत भले मोठे आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर मनपा आयुक्तांनी आज काही प्रभागात जात रस्त्यांसह समस्या बाबत पाहणी करीत अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत.
जळगाव शहरातील विविध समस्यांबाबत गेल्या आठवड्यात मनपाचे नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी मोठे आंदोलन उभे केले होते या आंदोलनला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा सुद्धा दर्शविला होता त्यानंतर आमदार राजू मामा भोळे यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन सोडण्यात आले दुसऱ्या दिवशी महासभेत नगरसेवकांची अनुपस्थिती असल्याने ही महासभा तहकूब करण्यात आली तर दुसऱ्या दिवशी दिनांक २ ऑगस्ट मंगळवार रोजी आयुक्त विद्या गायकवाड यांनी शहरातील अयोध्या नगर परिसरातील सोपान नगरात काँक्रिटीकरण रस्त्याची पाहणी करीत त्यांना एक वृद्ध महिला नागरिक सुभद्राबाई वसंत वाणी यांनी थेट आयुक्त गायकवाड यांच्याकडे जिव्हाळ्याची मागणी करीत म्हणाले की माय मह्या रस्ता बनवून दे म्हणजे मी मरण्याच्या आत या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे अशी विनंती केल्याने आयुक्त विद्या गायकवाड सुद्धा या ठिकाणी 15 लाख 50 हजारांचा रस्ता मंजूर करून तो तातडीने बनवण्यात यावा अशा सूचना देखील देण्यात आले आहे त्यानंतर आयुक्त गायकवाड हे रामेश्वर कॉलनीतील समर्थ चौकात काही समस्यांची पाहणी करीत सूचना देत त्यानंतर पिंप्राळा परिसरातील शिंदे नगरात नाल्याची तक्रार असल्याने या नाल्याची पाहणी केली या नाल्यावर असलेल्या अतिक्रमण बाबत इंजिनिअर यांना सूचना देत ते अनधिकृत बांधकाम काढून लवकरात लवकर गटारीचे काम पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या त्यानंतर पिंप्राळा परिसरातील हूडको या ठिकाणी गटारीचे काम सुरू होते. या कामाची पाहणी देखील आयुक्त विद्या गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे आंदोलनाला काही दिवसांनी का म्हणा पण यश आले हे महत्त्वाचे व शहराच्या विकासासाठी पुन्हा एकदा आयुक्त विद्या गायकवाड ॲक्शन मोडमध्ये येऊन रस्त्यावर येत थेट पाहणी करीत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावले आहेत त्यांच्यासोबत यावेळी शहर अभियंता चंद्रकांत सोनगि यांची उपस्थिती होती. यासह मनपा अधिकारी देखील आता प्रत्येक प्रभागात जाऊन समस्यची पाहणी करीत लागलीच कारवाई करीत असल्याचेहि समजते.
जनतेने मानले डॉ.सोनवणे यांचे आभार !
जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी गेल्या आठवड्यात जनतेच्या समस्या बाबत मोठे आंदोलन सुरू केले होते हे आंदोलन आता कुठेतरी यशस्वी होण्यात येत असताना त्यांना शहरातील काही नागरिकांनी फोनवरून आभार देखील मानले असल्याचे देखील डॉ. अश्विन सोनवणे यांनी सांगितले आहे.