
जळगाव मिरर | २९ जुलै २०२३
जळगाव शहरातील रोझलँड इंग्लिश मिडियम हायस्कूल मध्ये नुकतेच शनिवार दि.२९ रोजी कलर डे हरित दिवस साजरा करण्यात आला . विद्यार्थ्यांना रंगाची माहिती अनोख्या पद्धतीने समजवून देण्यात आली.
“नर्सरी ते चौथी” या प्राथमिक व माध्यमिक वर्गात ग्रीन डे साजरा करण्यात आला. या कलर डे च्या निमित्ताने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हिरव्या रंगाबद्दल माहिती दिली. यात त्यांनी हरित शेती , हिरवी पालेभाज्या, प्राणी ,पक्षी यांच्या विषयी माहिती समजून सांगितली.
हिरवी पाने फुलांची, प्राण्यांचे मुखवटे बनवून विद्यार्थ्यांनी चेहेऱ्यावर लावले. ग्रीन डे वर गाणे म्हणत घोषणाही दिल्यात. या कार्यक्रमासाठी वर्ग १ ली ते ४ थी च्या शिक्षकांनी परिश्रम घेतले .तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून एखाद्या उत्सवा प्रमाणे हा ग्रीन डे शाळेत साजरा केला. हा दिवस विशेष करून लहान मुलांना पर्यावरणाशी मैत्री करून भविष्यात या पर्यावरणाची आपल्याला कशी गरज असून त्यांचे महत्व समजेल म्हणून हा दिवस साजरा करण्यात येत असतो.





















