
जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२६
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जळगाव रेल्वे स्थानक येथील त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी फाउंडेशनचे डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच भारतीय संविधान निर्मितीतील महान कार्याची यावेळी आठवण करून देण्यात आली. समाजात समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जोपासना करण्याचा संकल्पही उपस्थितांनी व्यक्त केला.कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन केले.
या वेळी अध्यक्ष योगेश बागडे, सचिव राहुल नेतलेकर, वीर दहियेकर, संदीप गारुंगे,गणेश बागडे, गणेश बागडे,कार्तिक बाटूंगे,राहुल दहियेकर आदी समाजबांधव उपस्थित होते





















