
जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२४
येथील मेहरूण भागातील विचार वारसा फाउंडेशन, माता रमाई महिला संघ, रामेश्वर कॉलनी यांच्यातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा प्रत्येकाने पुढे नेला पाहिजे असे मत मांडले. प्रसंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कमल मोरे, उज्वला पनाड, उषा सुरवाडे, उषा पनाड, ज्योती गवई, विमल सपकाळे, पूनम निकम, ज्योती साबळे या महिला मंडळासह ऋषिकेश राजपूत, अक्षय गवई, अमोल पनाड, अक्षय सुरवाडे,मनिष चौधरी, निखिल शेलार आदी उपस्थित होते.