
जळगाव मिरर । २४ जून २०२३
जळगाव शहरा पासून जवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात २४ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास घडल्याने बांभोरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरानजीक असलेल्या बांभोरी गावातील गिरणा नदी पात्रात एका २४ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना दिनांक २३ रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्यासह पाळधी पोस्टचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.





















