जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२५
कानळदा-भोकर जिल्हा परिषद गट महिला राखीव झाला असून या गटातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या माजी प्राध्यापिका सौ. वर्षा धनंजय चव्हाण या प्रबळ दावेदार म्हणून उदयास आल्या आहेत. उच्चशिक्षित आणि समाजाभिमुख दृष्टिकोन असलेल्या सौ. चव्हाण यांनी शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ कार्य केल्यानंतर सामाजिक व राजकीय क्षेत्रातही सक्रिय भूमिका बजावण्याचा निर्धार केला आहे.
नवीन पिढीसाठी प्रेरणास्थान ठरणाऱ्या सौ. चव्हाण या कानळदा भोकर गटातील चव्हाण कुटुंबीयांच्या दांडग्या जनसंपर्काचा वारसा लाभलेल्या आहेत. त्यांच्या पती श्री. धनंजय चंद्रकांत चव्हाण तसेच सासरे श्री. चंद्रकांत जिजाबराव चव्हाण हे दोघेही स्थानिक राजकारणात सक्रीय असून समाजसेवेसाठी प्रसिद्ध आहेत.
याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगावचे उपसभापती श्री. जयराज जिजाबराव चव्हाण हे त्यांचे चुलत सासरे असून त्यांचा देखील या गटात प्रभावी जनसंपर्क असून, ते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. चव्हाण कुटुंबातील आणखी एक सदस्य श्री. निखिल चंद्रकांत चव्हाण यांच्या “टेन्ट अँड डेकोरेटर्स” व्यवसायाच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमात सातत्याने सहभाग असतो, ज्यामुळे घराण्याचा लोकसंपर्क अधिक व्यापक झाला आहे.
या सर्व घटकांच्या आधारावर सौ. वर्षा चव्हाण यांना या निवडणुकीत प्रचंड जनसमर्थन लाभत असून, त्यांच्या विजयाची खात्री असल्याचे स्थानिक पातळीवर चर्चा रंगली आहे. उच्चशिक्षित, अनुभवी आणि कार्यक्षम असा उमेदवार जिल्हा परिषदेत निवडून आल्यास स्थानिक विकासासाठी नवी दिशा मिळेल, अशी जनतेत भावना व्यक्त होत आहे.

 
			

















