जळगाव मिरर | २५ जुलै २०२६
धरणगाव शहराजवळील जळगाव मार्गावरील डब्बा कंपनीजवळ आज आयशर, ट्राला व बस यांच्यात जबर धडक झाली. या अपघातात आयशर व ट्राला चालक गंभीर जखमी झाले आहेत. सुर्दैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. परंतु, तिनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जळगाव रस्त्यावरील डब्बा कंपनीजवळ धरणगावकडून आयशर गाडी (एमएच १८, बीझेड ३२३२) जात होती. तर जळगावकडून जळगाव ते शिरपूर एसटी बस (एमएच- २०, बीएल २७३६) तसेज जळगाव कडूनच दगडी कोळशाने भरलेला ट्राला जात होता. दरम्यान, एसटी बसने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यातच ओव्हरटेक करत असताना या तिनही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ट्राला चालक तसेच आयशर चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ लागलीच जळगाव येथील सिव्हल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु, या भीषण अपघातात सुर्दैवाने जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर, या भीषण अपघातात तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेनंतर बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तर या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.




















