जळगाव मिरर | संदीप महाले
शहरातील रिंगरोड परिसरातील हॉटेल रोनकमध्ये दि.१४ रोजी मध्यरात्री १२.३० ते १ वाजेच्या सुमारास भाडेतत्त्वावर घेतलेल्या हॉटेल चालक आशिष मधुकर फिरके (वय ४८) यांनी हॉटेलच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ गळफास घेवून आपले आयुष्य संपविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील निवृत्ती नगरातील रहिवासी व हॉटेल रोनकचे हॉटेल चालक आशिष फिरके यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइट नोट लिहून ती स्टेट्सला ठेवून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला होता. त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटनुसार, रिंगरोडवरील रोनक हॉटेलमध्ये गेल्या तीन वर्षांपासून व्यवसाय करत असून या हॉटेलसाठी तीन वर्षांचे करारनामे केले होते. आता जागा मालकाने अचानक जागा खाली करण्याचा तगादा लावला आणि सतत त्रास दिला. जागा मालकाचा मुलगा वेळोवेळी धमक्या देत होता, असे आशिष फिरके यांनी चिठ्ठीत लिहले आहे. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहिले. ही चिठ्ठी त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दि.१६ रोजी दुपारी पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपासणी केली.
मध्यरात्री आशिष फिरके यांनी टोकाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या मित्र परिवाराला व नातेवाईकांना त्यांचे स्टेटस पाहिल्यानंतर सुसाइड नोट दिसली. त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिसांना कळवले. पोलिसांनी रोनक हॉटेलमध्ये धाव घेतली असता, फिरके यांचा मृतदेह आढळला. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दोन दिवस उलटले तरी याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कुटुंबियांनी अद्याप तक्रार दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
‘त्या’ बाप-लेकांची चौकशी होणार का?
आशिष फिरके यांनी लिहलेल्या सुसाईट नोट हॉटेल मालक व त्यांच्या मुलाने त्यांना हॉटेलची जागा खाली करून देण्याचा तगादा लावल्याचा आरोप फिरके यांनी सुसाईट नोटमध्ये केला होता. मात्र दोन दिवस उलटून देखील ‘त्या’ बाप-लेकावर कुठलीही चौकशी किवा गुन्हा दाखल करण्यात आले नसल्याची चर्चा सुरु असून यावर सखोल चौकशी होवून हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे का ? अशी देखील चर्चा सध्या शहरात जोरदार सुरु आहे.