जळगाव मिरर | ८ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता उमेदवारांना विजयी करण्यासाठी रणनीती आखली असून संजय राऊत यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांना पराभूत करण्यासाठीच आम्ही जळगावात उमेदवार दिल्याचे विधान केले होते. त्यांच्या याच विधानाला महाजन यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले कि, मी संजय राऊत यांच्यासारखा घर कोंबडा नाही. त्यांनी जळगावला येऊन बसावे मी पाच लाखांच्या वर लीड आणणार असे खुले आव्हान मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिले आहे. ”संजय राऊत यांना सांगा तुम्हाला माझे चॅलेंज आहे. सर्व महाराष्ट्र सोडा आणि जळगावला येऊन बसा पाच लाखांच्यावर लीड आणणार. गेल्या वेळीही लोकसभा मतदारसंघांमध्ये 4 लाख 65 हजाराचे लीड होते. यावेळेस पाच लाखांहून अधिक लीड दिली जाणार, मी तुमच्यासारखा घर कोंबडा नेता नाही. घरात बसून असा आरड ओरड मारत बसत नाही”, असे जोरदार उत्तर महाजन यांनी राऊतांना दिले आहे.
पुढे गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ”माझी औकात महाराष्ट्राला माहित आहे. तुम्हाला सुद्धा माहित आहे. तुम्ही तुम्हाला सोपी वाटणाऱ्या जागेवर निवडणूक लढवून दाखवा. आमदार, खासदार होऊन दाखवा. मग तुम्हाला तुमच्या औकात कळेल” असे महाजन म्हणाले. ”माझा एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध नाही. ते म्हणतात माझी पोहोचवरपर्यंत आहे. दिल्लीत माझा प्रवेश होणार आहे असे त्यांनी सांगितले. ते मोठे नेते आहेत त्यामुळे खालच्या लोकांशी ते बोलत नाहीत”, असा टोला महाजन यांनी लगावला.
तसेच जागावाटपाबाबत बोलतांना ते म्हणाले”आमच्यात कुठेही बंडखोरी होणार नाही. आम्हाला विश्वास आहे की चर्चा झाल्यानंतर हे सर्व प्रश्न मार्गी लागतील. हिंगोलीत दबावाचा प्रश्न नाही.जनमत जाणून घेतले आहे. त्यानुसार उमेदवारी बदलली आहे. आम्ही दिलेला नवीन दिलेला उमेदवार शंभर टक्के निवडून येईल”, असेही महाजन स्पष्टपणे म्हणाले.
