जळगाव मिरर | १४ जून २०२३
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज्यात अनेक सामाजिक उपक्रम तर राज्यातील अनेक कार्यकर्ते शिवतीर्थकडे धाव घेत राज ठाकरे यांना भेटण्यासाठी लगबग सुरु असतांना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे यांना टोमणे मारले आहे.
राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून सगळीकडे पोस्टर लागले आहेत. ते व्हावेत अशी मनापासून शुभेच्छा. सध्यातरी एकच आमदार आहे, अजून जवळपास पन्नास-साठ तरी वाढवावे लागतील. यासाठी त्यांनी कृतीशील कार्य करावं याच शुभेच्छा. नुसतेच टोमणे, नकला असं न करता महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप काय आहे ते जर महाराष्ट्राला कळलं तर बरं होईल. याचा आवाज काढून, याला मी शेपटीला धरून आपटीन, त्याला मी हाताला धरून फिरवीन असे प्रकार कमी करावेत.. असे आव्हाड म्हणाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर मनसे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कालपासून राज्यभरातील मनसैनिक शिवतीर्थाव गर्दी करत आहेत. राज ठाकरे यांनीदेखील निवासस्थानाबाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या.