
जळगाव मिरर / १५ डिसेंबर २०२२
प्रेमप्रकरणात भांडण होणार नाही असे होऊच शकत नाही पन काही भांडण हे लागलीच सुटत असतात तर काही भांडण शेवटच्या टोकाला जाऊन त्याचे काय होईल हे सांगता हि येत नाही अशीच एक धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आहे तो तेथून मानपाडा पोलीस ठाण्यात जात कबुली हि दिली आहे. प्रियकराचे नाव संदीप अहिरे असे आहे. तर मयत तरुणीचे वैशाली मस्तूद असे आहे. मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात जवळपास दोन वाजण्याच्या सुमारास एक तरुण आला. या तरुणाने मी शेजारी राहणाऱ्या महिलेची हत्या करुन पोलीस ठाण्यात आलो आहे असे सांगितले. हे ऐकताच पोलीस हैराण झाले. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. कल्याण शीळ रोड परिसरातील टाटा नाका परिसरातील श्रीहरी चाळीत पोलीस दाखल झाले. पोलिसांनी महिलेच्या घरी जाऊन पाहिले असता खरोखर तिचा मृतदेह घरात आढळून आला. वैशाली मस्तूद आणि संदीप अहिरे हे शेजारी शेजारी राहत होते आणि त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरु होते. प्रेमसंबंधातून या दोघांमध्ये वाद झाले होते. या वादातून संतापलेल्या संदीपने आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तिचे घर गाठले. तिच्या घरात कुणी नव्हते. या दोघांमध्ये वाद झाला संतापलेल्या संदीपने ब्लेडने वैशालीचा गळा चिरला. या घटनेत वैशालीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वैशालीला तिथे सोडून संदीपने थेट मानपाडा पोलीस ठाणे गाठले. संदिपने पोलिसांकडे आपण केलेल्या या कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी संदीप अहिरेला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.






















