जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२४
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांचे गेल्या काही महिन्यापासून मोठे आंदोलन सुरु होते पण आता त्याच आंदोलना विरोधात एस.आय.टी.चौकशीची घोषणा मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी केल्याने मनोज जरांगे यांनी देखील याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, होवू द्या चौकशी, आता दूध का दूध पानी का पानी होऊनच जाऊदे. मी देखील सर्व उघड करतो. वाटलेच तर सलाईन उचलून चौकशीला येतो, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका. मराठा समाजातील वकिलांना विनंती आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांच्यासाठी लढा. वकिलांनी मोफत लढावे, न्यायालयातून जामीन करून घ्या. देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत. तुम्ही सगळ्यांनी शांततेत राहा. मी बघतो काय करायचे, असे जरांगे म्हणाले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवत आहेत. आता दूध का दूध पानी का पानी होऊनच जाऊदे. मी देखील सर्व उघड करतो. वाटलेच तर सलाईन उचलून चौकशीला येतो. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करणारच आणि तोपर्यंत आम्ही बोलतच राहणार, असे म्हणत फडणवीस यांच्याबद्दल आपली भूमिका ठाम असल्याचे जरांगे यांनी म्हंटले आहे. तसेच ”मी कुठे चुकत नाही आणि कुठेच गुंतू शकत नाही. मी तुमच्या एसआयटीला घाबरत नाही. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो. मी मराठ्यांचे काम करतोय. ते सत्तेचा वापर करणार आहे. तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा”, असे जरांगे म्हणाले.