जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२५
महाराष्ट्रामध्ये अनेक स्त्री समाजसुधारकांनी महाराष्ट्रामध्ये अनिष्ट प्रथा परंपरांना पायबंद घालण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी अनमोल असे विचार मांडून कृतिशील समाज बदलाचा प्रयत्न केला. त्यांचे विचार महिलांनी आत्मसात केल्यास सकारात्मक बदल समाजामध्ये घडून येतील असे प्रतिपादन जळगावच्या माजी महापौर सीमा भोळे यांनी केले.
ज्ञानदात्री सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे मेहरूण परिसरात हरेश्वर हनुमान मंदिर, रामेश्वर कॉलनी येथे विचार वारसा फाऊंडेशनतर्फे विविध क्षेत्रात कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी सीमा भोळे या बोलत होत्या.
यावेळी विचार मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य पल्लवी रवींद्र देशमुख, शिवसेना महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, नोबेल स्कूलच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी, लहुजी फाउंडेशनच्या आशा अंभोरे, तुळजाई फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी आदी उपस्थित होते. सुरुवातीला प्रस्तावनेमधून संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
सदर कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत व संघर्ष करून कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे चालविणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सीमा भोळे आणि वैशाली झाल्टे, रुपाली भोकरीकर, अर्चना माळी यांनी मनोगतातून उपक्रमाचे कौतुक करीत स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे असे सांगितले. प्रकल्पप्रमुख जगतगुरु महिला बचत गट अध्यक्ष अलका राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे आयोजन विचार वारसा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल देशमुख, आशिष राजपुत, मयूर डांगे, मनिष चौधरी, ऋषिकेश राजपूत, निखिल शेलार, संकेत म्हसकर, गौरव डांगे, अमोल ढाकणे, आकाश तोमर, राहुल पाटील, चेतन राजपूत, अजय मांडोळे, मंगेश मांडोळे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले.
या महिलांचा केला सन्मान
सिमा सुरेश भोळे(माजी महापौर, पल्लवी रविंद्र देशमुख(माजी जिल्हा परिषद सदस्य), शोभा चौधरी(महिला आघाडी शिवसेना), सुमित्रा सोनवणे(माजी नगरससेविका), अर्चना सुर्यवंशी(नोबल स्कुल संचालिका), आशा अंभोरे(लहुजी ब्रिगेड), अर्चना माळी(सर्टीफाईड इन्ट्रलन्शनल मेकअप), डॉ.नेहा भंगाळे(शा.वै. महा. जळगाव), अँड. रुपाली भोकरीकर (भोकरीकर सर्व्हिसेस एलएलबी ग्रुप), वैशाली झाल्टे(संस्थापक अध्यक्ष अभेद फाउंडेशन), संगीता शिंदे (शा.वै.म.रु.परिचारिका), हेतल वाणी (सदस्य युथ फॉर हेल्प फाउंडेशन), रश्मी शिरसाठ(शिक्षिका योगा), प्रतीक्षा पाठक(पाठक फाउंडेशन), पूनम नाईक(मेकअप आर्टिस्ट)