
मेष राशी
श्रीगणेश सांगतात की, वैयक्तिक कामात व्यस्त राहाल. घरात धार्मिक कार्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहील. आपल्या योजना गोपनीय ठेवा, अन्यथा कोणीतर त्याचा गैरफायदा घेईल. इतरांच्या खासगी गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. बेकायदेशीर कामांकडे आकर्षित होऊ नका, कारण तपास किंवा दंड यांसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
वृषभ राशी
नातेसंबंध दृढ करायचे असतील तर अहंकार बाजूला ठेवावा लागेल. तरुणांचे करिअरविषयक चिंतेचे निराकरण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा, अनावश्यक प्रवास टाळा. परस्पर समजुतीने समस्या सुटतील. व्यवसायात काही नवीन यश मिळेल. मार्केटिंगसंबंधित कामांना प्राधान्य द्या. कामात छोट्या अडचणी येतील, रागामुळे नुकसान होऊ शकते.
मिथुन राशी
मित्र-नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील, विचारांची देवाणघेवाण होईल. यामुळे अनेक समस्या सोडवता येतील. घरात धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. आपल्या विचारांना सकारात्मक ठेवा. प्रवास टाळावेत. आयात-निर्यात संबंधित कामात गती येईल. आपली व्यवसायिक रणनीती गोपनीय ठेवा.
कर्क राशी
घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी समतोल राखाल. वैयक्तिक नात्यांमध्ये जवळीक निर्माण होईल. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. अनावश्यक वादांपासून दूर राहा. सासरच्या मंडळींशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. व्यवसायात निष्काळजीपणा करू नका. मार्केटिंग व संपर्क यंत्रणा बळकट करा.
सिंह राशी
ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. नियोजनपूर्वक काम केल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. धार्मिक व आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीवर वाद असला तर लगेच निर्णय घेऊ नका. मन विचलित होईल. कामाच्या ठिकाणी अंतर्गत बदल करणे फायदेशीर ठरेल.
कन्या राशी
वेळेचा योग्य वापर करा. मुले अभ्यासात गंभीर राहतील. कामाच्या ओझ्यामुळे चिडचिड होऊ शकते. निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. एखाद्या जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत कराल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. भागीदारी व्यवसायात गैरसमजांमुळे फाटाफूट होऊ शकते.
तुळ राशी
जर सरकारी काम अडकले असेल तर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टिकोनामुळे व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक क्रियाकलापात वेळ जाईल. रागाऐवजी संयम ठेवा. व्यवसायात प्रत्येक गोष्ट स्वत:च्या देखरेखीखाली पूर्ण करा. उत्पादनाची गुणवत्ता वाढवा. कुटुंबासोबत वेळ घालवा. गुडघेदुखीची तक्रार होऊ शकते.
वृश्चिक राशी
सामाजिक कार्यात सहभाग घ्या, यामुळे प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांचे प्रकल्प पूर्ण होतील. मुलांवर जास्त राग केल्यास ते हट्टी बनू शकतात. नकारात्मक मुद्दे काढू नका. व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल.
धनु राशी
अडकलेले पैसे किंवा कर्ज परत मिळण्याची शक्यता आहे. वेळ अनुकूल आहे. करिअरच्या दृष्टीने तरुणांना योग्य दिशा मिळेल. कोर्टाच्या प्रकरणात निकाल अपेक्षित नाही. कुणावरही अती विश्वास ठेवू नका. व्यवसायात नवीन प्रयोग करणे फायदेशीर ठरेल. प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. कोणालाही पैसे देण्याआधी परतफेडीची खात्री करा.
मकर राशी
बंद पडलेले उत्पन्नाचे स्त्रोत पुन्हा सुरू होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे. नातेवाईकांशी असलेले जुने वाद मिटतील. भावना व उदारता नियंत्रणात ठेवा. नवीन गुंतवणुकीपूर्वी पूर्ण तपासणी करा. व्यवसायात नवीन ग्राहकांशी व्यवहार करताना काळजी घ्या. राजकीय किंवा महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क होईल. अनावश्यक कामांपासून दूर राहा. घरात सौहार्दपूर्ण वातावरण राहील.
कुंभ राशी
जर मालमत्ता खरेदी-विक्रीसंबंधी काही काम सुरू असेल, तर ते पूर्ण होईल. कौटुंबिक व व्यवसायिक अडचणी सोडवण्यात तुमचा विशेष सहभाग राहील. आर्थिक बाबतीत थोडे जटिलतेचे वातावरण राहील. कोणी तुमच्या भावना व उदारतेचा गैरफायदा घेऊ शकतो. व्यवसाय पद्धतीत काही बदल आवश्यक आहेत. यामुळे भविष्यात फायदेशीर स्थिती निर्माण होईल.
मीन राशी
सामाजिक कार्यात महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल, हे संबंध तुम्हाला उपयुक्त ठरतील. कौटुंबिक कामात व्यस्तता राहील. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. व्यवसायात नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. पण घाई न करता गांभीर्याने काम पूर्ण करा. अडचण आल्यास एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबात सर्वजण आपापली जबाबदारी योग्य रितीने पार पाडतील.