जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२४
शहरात “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” महिला मेळावे विविध ठिकाणी व मंडळात घेण्यात आले. खा. स्मिता वाघ, आ. राजुमामा भोळे यांचेसह विविध मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
मंडळ क्रमांक १ मध्ये मेळाव्यात उपस्थित महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे,माजी नगरसेविका भारती सोनवणे, रेखा वर्मा, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, यामिनी सोनवणे, संजय शिंपी, उदय भालेराव, दिपक सूर्यवंशी, राजू मराठे, नितीन इंगळे, चित्रा मालपाणी यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी मार्गदर्शन केले. महिला सबलीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कौतुकास्पद निर्णय घेण्यात येत आहेत. तर राज्यातही महायुतीच्या सरकारमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न व कृती सुरु असल्याचे आ. भोळे म्हणाले.
मंडळ क्रमांक ८ मध्येदेखील “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी संगितखुर्ची, हंडीफोड, प्रश्न मंजुषा असे वेगवेगळे खेळ खेळण्यात आले. प्रसंगी खासदार स्मिता वाघ, महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, सदाशिवराव ढेकळे, राजेन्द्र घुगे पाटील, जितेन्द्र मराठे, विशाल त्रिपाठी, महादू सोनवणे, विजय वानखेडे, ज्योती बर्गे, नितीन इंगळे, दीपक बाविस्कर, विनोद मराठे व मंडळातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण होण्याचे प्रमाण आता भाजप सरकारच्या काळात वेगाने वाढत आहे. सरकारने आणलेल्या योजनांचा महिलांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले. तर खा. स्मिता वाघ यांनीही मनोगतातून महिलांना मार्गदर्शन केले.