
जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२४
जुन्या वादातून एका तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून डोक्यात दगड टाकून गंभीर दुखापत केली. ही घटना सोमवार दि. ९ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास शहरातील आकाशवाणी चौकातील वेलनेस मेडिकल जवळ घडली. याप्रकरणी दि. ११ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील वैभव विनोद पाटील (वय २१) हा तरुण सोमवार दि. ९ डिसेंबर रोजी मध्यरात्री तीन महिन्याच्या सुमारास सिनेमा पाहून दुचाकीने आकाशवाणी चौकातील वेलनेस मेडिकल जवळून जात असताना संशयित आरोपी उमाकांत वाघ आणि आकाश पाटील या दोघांनी त्याचा रस्ता आणून त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून डोक्यात दगड टाकला. दरम्यान या घटनेत विनोद पाटील हा गंभीर जखमी झाला, त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अजून त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी उमाकांत वाघ आणि आकाश पाटील या दोघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सलीम तडवी करीत आहे.