जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२६
शहरातील नवनाथ नगर परिसरातील काकाच्या घरी आलेल्या कौस्तुभ सतीश पोतदार (वय २७, रा. नवनाथ नगर) या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना दि. ७ फेब्रुवारी रोजी घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथे एमआर म्हणून काम करणारे कौस्तुभ पोतदार हे जळगावातील नवनाथ नगरात काकांच्या घरी आले होते. दि. ७ रोजी काका व घरातील इतर सदस्य बाहेर गेलेले असताना कौस्तूभ यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी करीत आहेत. कौस्तुभ यांच्या आईचे या पूर्वीच निधन झालेले आहे. तर वडील पिंप्राळा परिसरात राहतात. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दि. ८ रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.




















