जळगाव मिरर | २४ मे २०२३
जळगाव शहरातील एका परिसरात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तरुणाच्या हातातील मोबाईल लांबवला. हि घटना जानेवारी महिन्यात घडली असून तब्बल चार महिन्यानंतर तरुणाने तक्रार दिल्यावरून मंगळवार, 23 मे रोजी दुपारी अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी येथील १८ वर्षीय तरूण जयेश प्रकाश राणे हा जळगाव शहरात शिक्षणानिमित्त रहायला आहे. ११ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जयेश हा जळगाव भुसावळ रोडवरील हॉटेल कमल पॅराडाईज समोरील रोडवरून मोबाईलवर बोलत पायी जात असताना त्याच्या मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून आले व काही कळण्याआत त्यांनी जयेशच्या हातातील 13 हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. जयेशने ही घटना घरी कुणालाही सांगितली नाही मात्र मंगळवारी त्याने हा प्रकार सांगितल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहे.