जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२४
अभियांत्रीकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या हर्षल सुधाकर सोनवणे (वय १७, रा. दादावाडी) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. २१ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा भुसावळ येथील हर्षल सोनवणे हा तरुण दादावाडी परिसरात मामाकडे वास्तव्यास होता. त्याची आई शिक्षीका असून वडील एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. हर्षल हा शहरातील एका महाविद्यालयात अभियांत्रीकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षक होता. सोमवारी दुपारच्या सुमारास हर्षल हा घरी एकटाच असतांना त्याने दुसऱ्या मजल्यावरील घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या लक्षात येताच, त्याने तात्काळ हर्षल याला खाली उतरवून खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे हर्षल याची तपासणी केली असता, त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषीत केले. त्यानंतर हर्षलचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.