जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२४
निवडणूकीत मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांना मतदानाच्या आदल्या दिवशी स्वतःच्या घरावर गोळीबार करवून घेणे चांगलेच अंगलट आले आहे. त्यांनी दोघ मुलांसह शालकाच्या मदतीने स्वतःच्या घरावर गोळीबार केल्याचे पोलिसांच्या तपसात उघड झाले आहे. घटनेच्या दिवसापासूनच पोलिसांनी उमेदवारासह त्याच्या मुलांवर संशयाची सुई होती. एलसीबीच्या पथकाने या घटनेचा पर्दाफाश करीत कट रचणाऱ्या उमेदवाराच्या मुलासह गोळीबार करणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या. अन्य दोन जण फरार असून पथक त्यांच्या मागावर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर मतदार संघातून अपक्ष उमेदवारील दाखल केलेल्या शेख अहमद शेख हुसेन यांचे मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांच्या घरावर गोळीबार झाल्यामुळे संपुर्ण राज्यात खळबळ माजून गेली होती. या घटनेची विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दखल घेत अधिकाऱ्यांना या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाकडून घटनेच्या दिवसापासून त्याचा अनेक बाजूने तपास केला जात होता. तपासात उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांनीच मतदारांची सहानभूती मिळवण्यासाठी आपल्या दोघ मुलांसह शालक आणि त्याच्या मित्रासोबत मिळून स्वतःच्या घरावर गोळीबार करण्याचे षड्यंत्र रचल्याचे पोलिसांच्या तपसात उघड झाले आहे.
एलसीबीच्या पथकाने उमेदवार शेख अहमद शेख हुसेन, मुलगा शेख शिबान फाईज अहमद हुसेन, गोळीबार करणारा इरफान अहमद मोहम्मद हुसेन (रा. गांधीनगर चौक, मालेगाव, जि. नाशिक) या तिघांना अटक केली. तसेच गोळीबार करणारा मोहम्मद शफीक उर्फ बाबा आणि त्याचा भाचा शेख उमर फारूक अहमद हे दोघे फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
उमेदवार हे पुर्वी शहरातील एका शाळेत शिक्षक होते, त्यानंतर त्यांनी एका पक्षाचे जिल्हापदापासून राजकारणात प्रवेश केला. त्या उमेदवारासह त्याच्या दोघ मुलांकडून पोलिसांना आमच्या वडीलांचे शहरात सुमारे ४० ते ४५ हजार विद्यार्थी आहे. त्यांचे मत आम्हाच मिळणार असल्याचा दावा करीत होते. त्यामुळेच पहिल्या दिवसापासून संशयाची सुई ही त्यांच्याच भोवती फिरत होती. हाच धागा पकडत एलसीबीच्या पथकाने गोळीबार करणाऱ्यासह कट रचणाऱ्या उमेदवारासह त्याचा मुलगा शेख शिबान फाईज अहमद हुसेन याच्यासह गोळीबार करणारा इरफान अहमद मोहम्मद हुसेन यांना अटक केली, त्यांना खाक्या दाखविताच त्यांनी हा कट रचल्याची कबुली पोलिसांना दिली.