जळगाव मिरर / १६ फेब्रुवारी २०२३
जळगाव शहरातील एका परिसरात 35 वर्षीय तरूण दोन जणांचे भांडण सोडविण्यासाठी गेला असता एकाने त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी परिसरातील गोपाल दाल मिल परिसरात महेश दिलीप घुगे (वय-35) रा. देविदास कॉलनी यांचे रामेश्वर कॉलनीतील मेहुणे योगेश आंधळे आणि सचिन आंधळे यांचे 15 फेब्रुवारी बुधवारी रोजी भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्यासाठी महेश घुगे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने सचिन आंधळे याने शिवीगाळ करून हातातील दगड महेशच्या डोक्याला मारला. तसेच आमच्या भांडणाच्या मध्ये पडला तर जीवेठार मारेल अशी धमकी दिली. दगड मारल्याने महेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरूणाने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सचिन निंबा आंधळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कृष्णा पाटील करीत आहे.
