यावल : प्रतिनिधी
येथील सरला गजानन सोनवणे यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. याबाबत त्यांनी यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
सविस्तर वृत्त असे की, सरला सोनवणे यांनी वासुदेव केशव वडर यांच्याकडून पैसे घेतले होते. यानंतर वासुदेव वडर याने घरात जबरदस्तीने प्रवेश करून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. एवढेच नव्हे तर जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वासुदेव केशव वडर याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस हवालदार सिकंदर तडवी हे करत आहे.