जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२३
आजवर आपण अनेक बापांच्या कहाण्या वाचल्या असतील त्या कहाण्या अनेक बाप आपल्या मुलांसाठी हृदय सुद्धा देण्यास तयार असतात पण अशाच एका नराधम बापाने थेट आपल्या दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिल्याची घटना घडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका गावात घडले आहे. या दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आळसुदे या गावात गोकुळ क्षीरसागर परिवार वास्तव्यास असून त्यांना दोन चिमुकले आहे एक आठ वर्षाची ऋतुजा तर दुसरा मुलगा चार वर्षाचा वेदांत क्षीरसागर आहेत. नराधम बापाने घरापासून सहाशे मीटर अंतरावर असलेल्या एका विहिरीकडे दोन्ही मुलांना उचलून नेत पाण्यामध्ये फेकून दिले आहे. पाण्यामध्ये फेकताच काही वेळात या दोन्ही बालकांचा बुडून मृत्यू झाला असून या नराधम बापाने आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकल्याची घटना जशी गावामध्ये पसरली तसे नातेवाईक नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना देखील याबाबत माहिती दिली आहे. दोन्ही मुलांना तात्काळ पाण्याच्या बाहेर काढले असून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले दरम्यान पोलिसांनी नराधम बाप गोकुळ क्षीरसागर याच ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे पण या घटनेने जिल्हा नव्हे तर राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.