अमळनेर : विक्की उत्तम जाधव
महाराष्ट्र उच्च शिक्षण,माहिती व सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कट्टा या उपक्रमाच्या फलकाचे उदघाटन २६.०६.२३ रोजी दुपारी 2 वाजता प्राचार्य डॉ.अरुण जैन(कोचर)सर यांच्या हस्ते संपन्न झाले.करिअर कट्टा हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या दुष्टीने अतिशय उपयुक्त आहे,फक्त ३६५ रुपये नाममात्र शुल्क भरून विद्यार्थ्यांना रोज दोन तास अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळत असते.आय.ए.एस व उद्योजक या दोन्ही क्षेत्रात विद्यार्थ्यांना आपले करिअर करता येते याचप्रमाणे शासनाचे प्रमाणपत्र कोर्सेस सुद्धा करण्याची संधी प्राप्त होते.या उपक्रमात फक्त एकदाच शुल्क भरून पुढील तीन वर्षे मोफत सुविधा घेण्याची संधी उपलब्ध होते.
प्रस्तुत उदघाटन प्रसंगी संस्थेचे सह सचिव डॉ.धीरज वैष्णव,करिअर कट्टा समन्वयक डॉ.विजय तुंटे, वसतिगृह विभाग प्रमुख डॉ.अमित पाटील,डॉ.अशोक पाटील,डॉ.धनंजय चौधरी,प्रा.महाजन,प्रा.गोपाळ पाटील,लेखा परीक्षक राकेश निळे,दिलीप शिरसाठ,मेहूल ठाकरे,हिमांशू गोसावी,आकाश धनगर,चेतन पाटील यांच्या सह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी मा.प्राचार्य जैन सरांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.