जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२६
भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन जळगाव जिल्हा लोकल ट्रान्सपोर्ट चालक-मालक संघटना व जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे दाणा बाजार येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत माता पूजन तसेच मिठाई वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला व्यापारी वर्ग, हमाल बांधव आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दाणा बाजार येथे आयोजित कार्यक्रमात भारत माता पूजन करून राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. त्यानंतर उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास जळगाव जिल्हा मेडिसिन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील दादा भंगाळे, दाणा बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सेठ, फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी, रेडिमेड कपड्यांचे असोसिएशनचे अध्यक्ष राजेश सेठ, हार्डवेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय गांधी तसेच बी. जे. मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश आवा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जळगाव जिल्हा लोकल ट्रान्सपोर्ट चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष मधुकर इंगळे, उपाध्यक्ष अन्ना चौधरी, उपाध्यक्ष बिपिन पवार, सचिव रईस शेख, खजिनदार धनसुख वर्मा, सहसचिव लल्ला सेठ आणि सल्लागार शाहिद सालार यांच्यासह सभासद अंजार सेठ, दीपक हळदे, किरण झंवर आणि मोत्या संस्थेने यांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास व्यापारी वर्ग, हमाल बांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भारत माता पूजन व मिठाई वाटपाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, राष्ट्रप्रेम आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव जिल्हा लोकल ट्रान्सपोर्ट चालक-मालक संघटना व जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवर, व्यापारी बांधव, हमाल बांधव आणि सभासदांचे संघटनेतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.




















