जळगाव मिरर | २० मे २०२५
रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथे एका आरोपीकडे दोन पिस्तुल असल्याची माहिती निंभोरा पोलिसांना मिळताच आरोपीस अटक केली.
सविस्तर वृत्त असे कि, निंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनी हरिदास बोचरे यांना माहिती मिळाल्याने लागलीस दि. १८ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी हरिदास बोचरे, फौजदार अभय ढाकणे, चालक योगेश चौधरी, पो. कॉ. सुरेश पवार, पो.कॉ. अमोल वाघ, पो. कॉ सरफराज तडवी, पो.कॉ. रशीद तडवी, पो.कॉ. प्रभाकर ढसाळ, पो. हे. कॉ. सुरेश अढायके यांनी खिर्डी खु येथील शेती शिवारात जाऊन केळी बागेच्या लगत असलेल्या आरोपी अनिल रामलाल बारेला (वय ३१, मुळ रहिवासी मध्यप्रदेश) याच्या घराजवळ जाऊन चौकशी करून त्याचा पाठलाग करून मोठ्या शितापीने दोन गावठी पिस्तुलसह त्याला रंगेहात पकडला. हे गावठी पिस्तोल सुमारे अठरा हजार किमतीचे आहे. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद पो.कॉ. सर्फराज तडवी यांनी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पिस्तुलासह आरोपीस पकडल्याबद्दल निंभोरा पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. फैजपूर पोलिस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे, निंभोरा सपोनी हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अभय ढाकणे व पोलीस तपास करीत आहेत.




















