मेष राशी
श्रीगणेश सांगतात की, आज प्रलंबित काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नम्र स्वभावामुळे समाजात व नात्यात योग्य मान-सन्मान टिकेल. जवळच्या व्यक्तीसोबत अचानक वाद टाळा. शांततेने प्रश्न सोडवा. तुमच्या योजना व कृती कोणासोबतही शेअर करू नका. कामाच्या ठिकाणी सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. दिनचर्या संतुलित ठेवा.
वृषभ राशी
मागील चुकांमधून धडा घेऊन आज सकारात्मक धोरण आखल्यास यश लाभेल. घरातील सजावटीचे कामं सुरू होऊ शकतात. काही कामांत अपेक्षित यश न मिळाल्याने थोडं अस्वस्थ वाटू शकतं; पण लवकरच उपाय सापडेल. चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन व्यवसायविषयक माहिती मिळू शकते. पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचना श्रीगणेश करतात.
मिथुन राशी
धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये आज तुमची रुची असेल. एखाद्याला मदत केल्यामुळे आध्यात्मिक समाधान मिळेल. शुभचिंतकाकडून मिळणाऱ्या आशीर्वादाचा फायदा होईल. आर्थिकदृष्ट्या विचारपूर्वक निर्णय घ्या. फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे कोणालाही तुमच्या योजना सांगू नका. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. कामाच्या ठिकाणी दुरुस्त्यांचे नियोजन होईल. वैवाहिक जीवनातील वादाचा घरगुती वातावरणावर परिणाम होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क राशी
आज तुम्ही संयम आणि सूज्ञपणे समस्यांवर मात कराल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करताना तुम्हाला आनंद मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा नातेवाईकांशी संबंध बिघडण्याची शक्यता. तरुणाईला मानसिक तणाव जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. पती-पत्नीमध्ये सुसंवाद राहिल.
सिंह राशी
आज तुम्ही संयम आणि सूज्ञपणे समस्यांवर मात कराल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करताना तुम्हाला आनंद मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा नातेवाईकांशी संबंध बिघडण्याची शक्यता. तरुणाईला मानसिक तणाव जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. पती-पत्नीमध्ये सुसंवाद राहिल.
कन्या राशी
अडकलेली थोडीफार रक्कम मिळू शकते. मनात समाधानाची भावना राहील. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. इतरांवर शंका घेतल्याने नातेसंबंध बिघडू शकतात, त्यामुळे विचारांत लवचिकता ठेवा. विरोधकांपासून घाबरून जाऊ नका. मुलांना त्यांच्या अडचणीत मदत करा. सध्याच्या व्यवसायावर लक्ष द्या. जोडीदाराचा सल्ला घेतल्यास योग्य मार्गदर्शन मिळू शकते.
तूळ राशी
आज धार्मिक व आध्यात्मिक कार्यांमध्ये व्यस्त असाल. काही खास लोकांच्या संपर्कामुळे विचारसरणीत मोठा बदल होईल. जुनी चिंता दूर होईल. आर्थिक अडचणींमुळे थोडा तणाव संभवतो. जवळच्या व्यक्तीकडून टीका झाल्यास निराशा येऊ शकते. कुणावरही अति विश्वास ठेवू नका. व्यवसायात विशेष यश मिळेलच असे नाही. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक राशी
आज तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नवे यश देईल. स्व: विकासावर लक्ष केंद्रीत कराल. गर्दी टाळा. थोडा वेळ एकांतात घालवल्यास मनशांती लाभेल. आर्थिक व्यवहार टाळा. कामाच्या ठिकाणी नकारात्मक विचारसरणीच्या लोकांसोबत राहा, फायदा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. महिलांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.
धनु राशी
सामाजिक कार्यांमध्ये तुमचा सहभाग असेल. महिलांना त्यांच्या कार्यात यश मिळेल. गेल्या काही दिवसांपासून असलेली द्विधा मन:स्थिती दूर होईल. किरकोळ गोष्टींवर चिडचीड झाल्याने घरातील वातावरण बिघडू शकते. मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रांची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आज व्यस्तता अधिक असेल. घरातील वातावरण आनंदी राहिल. सध्याच्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम संभवतो.
मकर राशी
श्रीगणेश म्हणतात की, भविष्यासाठी योजना तयार करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळा. मुलांच्या करिअरविषयी चांगली बातमी मिळाल्यास घरात आनंदी वातावरण असेल. गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता.
कुंभ राशी
आज तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटाल. कोणत्याही समस्येवर विचारपूर्वक उपाय काढाल. जवळच्या नातेवाईकांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खर्चावर नियंत्रण आवश्यक. नकारात्मक लोकांपासून लांब राहा. काही जण तुमच्या यशामुळे द्वेष करतील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. पती-पत्नीमध्ये मधुर संबंध राहतील.
मीन राशी
सकारात्मक वृत्ती असलेल्या लोकांबरोबर वेळ घालवल्याने संपर्क क्षेत्रात वाढ होईल. अविवाहितांना विवाहविषयक योग जुळतील. कुटुंबासोबत खरेदीत वेळ जाईल. घाईत घेतलेले निर्णय बदलावे लागू शकतात. स्वतःच्या कामासाठी वेळ न मिळाल्याने थोडी नाराजी राहील. लवकर यश मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडू नका. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. रक्तदाब किंवा थायरॉईड असलेल्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी.
