जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२३
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु असतांना आता गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर पावसाचा जोर वाढला असून सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार असा, अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने आज मुंबई, पुणे ठाणे, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर कोकणाला ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. याशिवाय मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
रविवारी आणि सोमवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला होता. त्यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. त्याचबरोबर मुंबईसह उपनगरातही पावसाने सोमवारी अधून मधून हजेरी लावली. दुसरीकडे कोकणात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार बँटिंग सुरुच ठेवली. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली.