जळगाव मिरर | १९ नोव्हेबर २०२३
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या एका गावात २६ वर्षीय तरुणाला छातीत त्रास होऊन ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरानजीक असलेल्या आसोदा यागावातील भूषण किसन बोरसे (वय २६) हा तरुण दि.१८ नोव्हेंबर शनिवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तरुणाच्या छातीत त्रास होऊ लागला. नातेवाईकांनी तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहेत.