• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा : पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 27, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा : पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२६ 

रोमांचक आणि थरारक सामन्यांनी जैन ड्रीम स्पेसेस वर रंगलेल्या जळगाव क्रिकेट लिगचा अंतिम सामना अमळनेर सुहांस जायंट्स व जळगाव कोगटा किंग्ज मध्ये झाला. पुर्वेस चौधरीच्या मॅचविनिंग खेळीने जळगाव कोगटा किंग्ज यंदाच्या जेसीएलच्या चषकावर आपले नाव कोरले.

जळगाव कोगटा किंग्स ने नाणेफेक जिंकून कर्णधार जगदीश झोपे यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अचूक गोलंदाजीच्या जोरावर अमळनेर सुहांस जायटंसच्या फलंदाजांना अंकूश लावला. तत्पूर्वी सलामीचे फलंदाज मानव टिपरेवाल व ऋषी यादव यांनी आक्रमक खेळाला सुरवात केली मात्र ऋषी यादवचा कर्णधार जगदीश झोपेच्या बॉलवर पूर्वेस चौधरीने झेल घेतला एक षटकार एक चौकार लगावत 10 चेंडू मध्ये 13 धावा काढून तो बाद झाला. नंतर लगेचच ४.६ षटकात एक षटकार आणि तीन चौकार च्या साह्याने 26 धावा काढून मानव टिपरेवाल धावचित झाला. यानंतर क्वालिफायर च्या पहिल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणारे शुभम शर्मा ४३ चेंडूत ६२ धावा त्यात ९ चौकार, २ षटकार तर रणजित निकम ने २९ चेंडूत ४७ धावा, ३ चौकार व ३ षटकार लगावले. ८ गडीच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात १६६ धावा धावफलकावर लगावल्यात. जळगाव कोगटा किंग्ज चे कर्णधार जगदीश झोपे याने ४ षटकात १८ धावा देत ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. उबेद खाटिक याने ३ षटकात १३ धावा देत ३ विकेट घेतल्यात.

जळगाव कोगटा किंग्ज आक्रमक फलंदाज ओम भोसले याने १९ चेंडू ३४ धावा ५ चौकार, १ षटकार त्याच्यासोबत जितेंद्र निकम याने ३२ चेंडूत ४ चौकारच्या मदतीने ३३ धावा करुन ५० रनांची ताबडतोब सलामी दिली. त्यानंतर मनिष चौहान २५ चेंडूत ३६ धावा ३ षटकार व २ चौकार तसेच पुर्वेस चौधरीचे २२ चेंडूत ५ उत्तूंग षटकांरांसह ४३ धावा करुन जळगाव क्रिकेट लिगच्या दुसऱ्या पर्वाच्या चषकावर आपले नाव कोरले. जळगाव कोगटा किंग्ज ने १८.२ षटकात ५ गडींच्या मोबदल्यात १७१ धावा करुन विजय मिळविला. शुभम शर्मा याने ४ षटकात त्यात एक निर्धाव षटक टाकत अवघ्या ५ धावा दिल्यात. त्याला सतीश चतुर्वेदी याने ४ षटकात ३६ धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले. गौरव ठाकूर याने एक गडी बाद केला.

ग्रॅण्ड फायनलची ग्रॅण्ड एन्ट्री..

जळगाव क्रिकेट लिगची ग्रॅण्ड फायनलचा उद्गघाटन सोहळा ग्रॅण्ड झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, युसूफ मकरा, बाफना ज्वेलर्सचे सिद्धार्थ बाफना, आदित्य फार्मचे यश सुनील मंत्री, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालाचे जयवंत नागूलकर उपस्थीत होते.
उपस्थीत मान्यवरांनी जेसीएल च्या आयोजनात ज्यांनी मोलाची भुमिका निभावली त्यांचा सत्कार करण्यात आला.
अखिलेश तिलकपूरे यांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य करुन प्रेक्षकांची मने जिंकली. जेसीएलच्या सीजन फर्स्ट मध्ये विजेत्या रामलाल चौबे ट्रस्टच्या संघाचा कर्णधार शशांक अत्तरदे व संघमालक प्रकाश चौबे हे चषक घेऊन क्रीडांगणात ग्रॅण्ड एन्ट्री केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी रोहन घुगे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट संघा चे अध्यक्ष अतुल जैन, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी दोन्ही संघांचे खेळाडूसुद्धा उपस्थित होते.

पालकमंत्र्यांकडून नियोजनाचे कौतूक
जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीने जैन ड्रीम स्पेसेस च्या भव्य क्रीडांगणावर आयोजीत केलेल्या जळगाव क्रिकेट लिग चे नियोजनाबद्दल आयोजक अशोक जैन, अतुल जैन यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष कौतूक करुन आभार मानले.

जळगाव क्रिकेट लिगमध्ये पारितोषिकांचा वर्षाव

जळगाव क्रिकेट लिग स्पर्धेत यंदा विजेत्या व खेळाडूंवर लाखोंच्या पारितोषिकांचा वर्षाव करण्यात आला. संघांसह वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही आकर्षक बक्षिसे दिली गेलीत. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनसह गौराई नर्सरी, वर्धमान हॉस्पीटल, पगारिया ऑटो, नवरंग चहा, सोना आसाराम महाजन अॅण्ड सन्स, नेक्सा, सुरेश कलेक्शन, रॉबीन स्पोर्ट्स यांनी पारितोषीकांचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. अंतिम सामन्यामध्ये सामनावीर म्हणून पुर्वेश चौधरी याला सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी अशोक जैन, अतुल जैन, मयंक पारिख, रिषभ दुसाने, संदीप काबरा, युसूफ मकरा, विवेक जोशी, आनंद मल्हारा, राहूल पवार, डॉ. पराग नहाटा, अमर कुकरेजा, चंदन महाजन, अनिश शहा, भारती चौधरी, दर्शना चौधरी, प्रमोद कोगटा, अतुल कोगटा, प्रतीक जीवरन उपस्थित होते. याप्रसंगी खेळांडूच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त केले.

संघ पारितोषिके : –
चॅम्पियन्स जळगाव कोगटा किंग्ज संघाला ₹2,00,000 रोख पारितोषीकासह चॅम्पियन्स ट्रॉफी
उपविजेत्या अमळनेर सुहांस जायंटस संघाला ₹1,00,000 रोख पारितोषीकासह ट्रॉफी
तृतीय क्रमांक – ₹50,000, जामनेर सातपुडा हिरोज
चतुर्थ क्रमांक – ₹50,000, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स
फेअर प्ले अवॉर्ड – ₹20,000, अमळनेर सुहांस जायंटस्
वैयक्तिक विशेष कामगिरी पुरस्कार :
अमळनेर सुहांस जायंटचा शुभम शर्मा ला प्लेअर ऑफ द लीग म्हणून पल्सर मोटारसायकल, बॅट, पॅड्स, ग्लोव्हज, किट बॅग व ट्रॉफी
जळगाव कोगटा किंग्जचा ओम भोसले याला बेस्ट फलंदाज म्हणून ऑरेंज कॅपसह ₹15,000, रोख रक्कम बॅट, ग्लोव्हज, किट बॅग, ट्रॉफी
जामनेर सातपुडा हिरोजचा रवि पाटील याला बेस्ट गोलंदाज म्हणून पर्पल कॅपने व ₹15,000, रोख रक्कम क्रिकेट शुज, किट बॅग, ट्रॉफी
अमळनेर उदयोमुख खेळाडू – शूज व ट्रॉफी
सर्वाधिक सिक्सेस – ₹7,500, रोख रक्कम ओम भोसले
सर्वाधिक डॉट बॉल्स – ₹7,500 रोख रक्कम
बेस्ट कॅच – ₹10,000 रोख रक्कम

सहा संघातील १०८ खेळाडूंनी दाखविले आपले कौशल्य
जळगाव कोगटा किंग संघ मालक प्रेम कोगटा, अतुल कोगटा, प्रणव कोगटा, कर्णधार जगदीश झोपे, प्रशिक्षक घनश्याम चौधरी, जामनेर सातपूडा हिरोज् संघ मालक किरण बच्छाव, कर्णधार शतायू कुलकर्णी, प्रशिक्षक मुस्ताक अली, पाचोरा एसकेटी योद्धाज संघ मालक हेमंत कोठारी, प्रणव कोठारी, कर्णधार सचिन चौधरी, प्रशिक्षक पंकज महाजन, चाळिसगाव एसपीसीसी चॅलेंर्ज्स संघ मालक सागर पार्क क्रिकेट क्लब, कर्णधार ओम मुंडे, प्रशिक्षक सचिन सोनवणे, रावेर रॉयल्स संघ मालक सीए महावीर जैन, विमल जैन, अखिल बनवट कर्णधार धवल हेमनानी, प्रशिक्षक तन्वीर अहमद, अमळनेर सुहांस जायंटस संघ मालक संदीप काबरा, श्रेयांस काबरा, कर्णधार शुभम शर्मा, प्रशिक्षक राहूल निंभोरे अशा सहा टीमसह १०८ खेळांडूंनी जळगाव क्रिकेट लिगचा महाकुंभमध्ये आपले कौशल्य पणाला लावले.

आकर्षक रोषणाईला प्रेक्षकांची दाद…

मेहरुण तलावाच्या जवळ असलेल्या निसर्गरम्य वातावरणातील जैन ड्रीम स्पेसेस क्रीडांगण रविवारी रात्री झालेल्या जळगाव क्रिकेट लिगच्या अंतीम सामन्यासाठी जळगावकरांनी उदंड प्रतिसाद दिला. अक्षरशा: जागा मिळेल तिकडे प्रेक्षकांनी सामनाचा आनंद घेतला. आकर्षक रोषणाई व डिजेच्या तालावर जळगाव कोगटा किंग्ज ने विजयाची धाव घेताच एकच जल्लोष प्रेक्षकांनी केला. प्रेक्षकांच्या गर्दीने जळगाव क्रिकेट लीग मधील गर्दीचा विक्रम मोडला.

Related Posts

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण
जळगाव

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

April 27, 2026
बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात
क्राईम

बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

April 27, 2026
कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !
क्राईम

कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !

April 27, 2026
marhan
क्राईम

हळदी समारंभात वादातून रक्तरंजित हल्ला; कोयत्याने वार, तिघांविरुद्ध गुन्हा !

April 27, 2026
कौतुकास्पद : जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !
जळगाव ग्रामीण

कौतुकास्पद : जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !

April 27, 2026
मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !
जळगाव

मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !

April 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

April 27, 2026
बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

April 27, 2026
कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !

कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !

April 27, 2026
marhan

हळदी समारंभात वादातून रक्तरंजित हल्ला; कोयत्याने वार, तिघांविरुद्ध गुन्हा !

April 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group