जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२५
जळगाव जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सध्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव आणि जळगाव जिल्ह्याचे पालक सचिव असलेले रामास्वामी एन. यांनी शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यात जिल्हा परिषदेला भेट देऊन विविध योजनांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारत तसेच नवीन इमारतीची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी राबविलेल्या उपक्रमांच्या आणि कामकाजाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. जुन्या आठवणींमध्ये रममाण होत त्यांनी त्या काळातील कामाचा अनुभव आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी त्यांचे स्वागत करून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आणि उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाने, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप झोड, जलसंधारण अधिकारी अमोल पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 
			

















