जळगाव मिरर | २१ जुलै २०२६
शहरातील नवीन जोशी कॉलनी परिसरातील राहत्या घरात गणेश शिवाजी कासारे (वय ३८) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. २० जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या मुलगा घरात गेला असता, त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्याला एकच धक्का बसला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेली माहितीनुसार, शहरातील नवीन जोशी कॉलनी परिसरात राहणारे गणेश कासारे हे शहरातील एका किराणा दुकानावर कामाला होते. सोमवार दि. २० जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घरात कोणीही नसतांना त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचा मुलगा घरात गेला असता, त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. वडीलांना गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच त्याला धक्का बसला आणि त्याने आक्रोश केला. कासारे यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.




















