जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील शरद पवार गटातून बाहेर पडत अजित पवारांनी सरकारसोबत जाण्याच्या निर्णय घेतल्यानंतर अनेक नेत्यासह आमदार त्यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली होती तर यातील एक मंत्र्याने आता मोठा गोप्यस्फोट केला आहे.
अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले कि, अजित पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांच्यासोबत ४५ आमदार आहेत. येत्या काळात ५३ आमदार होतील हे नक्की; असा; दावा करत जयंत पाटील हे आमच्यासोबत येण्यासाठी वेटिंगमध्ये असल्याचा देखील दावा त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीप यांनी जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासोबत येणार होते. मात्र ते एका घटनेमुळे थांबले असे वक्तव्य केले. यावर राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना गोंदियामध्ये विचारले असता त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून मराठा बांधव आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मराठा आरक्षणा संदर्भात विचारले असता मराठा बांधवांनी आक्रमक होऊ नये, हे चुकीचे आहे. आमचे सरकार मराठ्यांच्या पाठीशी असून क्रांतीकारक निर्णय घेणार असेही आत्राम म्हणाले.