जळगाव मिरर / ६ मार्च २०२३ ।
पिंप्राळा परिसरातील गट नंबर 277/2 मधील सोनी नगरातिल एका रहिवासीने गटार बंद केल्याने गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून नागरिकांच्या घरासमोर घाण पाण्याचे डबके साचल्याने परिसरातील महिलांनी मनपाचे उपायक्त गणेश चाटे यांच्याकडे समस्यांचा पाढा सांगितला होता तसेंच उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेऊन आपबिती सांगितल्यानंतर मनपाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत सोनगिरे व बांधकाम विभागाचे मनोज वनोरे यांनी प्रत्यक्ष परीसरात पाहणी करून 4 रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता मनपाचे जेसिबीने ज्या व्यक्तीने गटार अडवून ठेवली होती तेथूनच सुरुवात करुन अडविलेल्या गटारीचा मार्ग मोकळा झाला.
येत्या 15 दिवसात नवीनच गटार बांधून देणार -उपमहापौर
यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी परीसरात भेट दिली असता महिलांनी विचारले की, आता गटार कधी होणार तर येत्या 15 दिवसात नवीनच गटार बांधून देणार असे आश्वासन दिले.
काहिनी वाद घातला
परीसरात सकाळी 10 वाजता जेसिबी येताच ज्यांनी गटार अडविले होते सुरूवातीला त्यांनी मनपाच्या कर्मचाऱ्याशी वाद घालत मोबाईल वरून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तसेच जेसिबि समोर आडवे झाले.मात्र मनपाचे आरोग्य निरीक्षक रामदास कांबळे यांनी त्याला न जुमानता अखेर जेसिबीने गटारीचे सांडपाणीचा मार्ग मोकळा केला.
खड्डयातूनच घरात प्रवेश
जेसिबीने अनेकांचे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन व बोअरींगचे कनेक्शन तुटल्याने नगरसेविकाचा मुलगा अतुल बारी व बंटी बारी यांच्याशी संपर्क केला. जेसिबीने गटारीचे मोठे खड्डे पडल्याने लहान मुलांना व वृद्ध महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांना खड्डयातूनच घरात प्रवेश करावा लागणार असल्याने त्वरित गटारी बांधण्यात यावी अशी मागणी परीसरातील महिलांनी केली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, बांधकाम विभागाचे मनोज वनोरे, लिलाधर पाटील, दिपक पवार, बंटी बारी, आदि उपस्थित होते.