जळगाव मिरर । १५ जानेवारी २०२३ ।
दि. १४ रोजी कैलास क्रीडा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्हा कब्बडी असोसिएशन च्या मान्यतेने ४० किलो वजनी गटाच्या कब्बडी स्पर्धा संपन्न झाल्या.
जळगाव शहरातील कैलास क्रीडा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ४० किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय खेळाडू जयेश महाजन व दिगंबर चौधरी जयेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेत ८ संघांनी सहभाग घेतला होता त्यात महर्षी व्यास कब्बडी संघाने अंतिम सामना जिकत विजय मिळवला तर नेताजी सुभाष कब्बडी संघ उप विजेता ठरला. तर तृतीय क्रमांक महर्षी फाऊंडेशन ने पटकावला. बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे माजी सरपंच विकास महाजन बाळासाहेब कंखरे कब्बडी असोसिएशन चे खजिनदार सुनील राणे आनंद महांगळे माजी खजिनदार गिरीश नाईक शिवसेना उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर विनय चौधरी आदींची उपस्थिती होती